Adarsh Dairy Fresh & Healthy Milk Products

आदर्श डेअरीबद्दल अधिक माहिती

महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाची भरभराट होण्यासाठी आदर्श दूध उत्पादक व प्रक्रिया समूहाचे संचालक सहकारत्न श्री. मानकापे दादा यांनी अनेक नवीन संकल्पना राबविल्या आहेत. कमीत कमी खर्चात आधुनिक पध्दतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. गेल्या सहा-सात वर्षात आम्ही दुग्ध व दुग्धपदार्थ उत्पादनात ताजेपणा, शुद्धता आणि विश्वसनीयता या बळावर मराठवाड्यातील दुग्ध व्यवसायाची बाजारपेठ काबीज केली आहे.

पारंपरिक कृषी व्यवसायाला दूध उत्पादनाच्या जोडधंद्याची आवश्यकता लक्षात घेऊन भारतीय शेतकरी आता दूध उत्पादनातही अग्रेसर होतो आहे. या व्यवसायाच्या उभारणीला आधुनिक तंत्राची जोड व व्यावसायिकतेचे अधिष्ठान दिल्यास हा व्यवसाय प्रचंड फलदायी ठरू शकतो, या विचाराने संशोधन केल्यावर ‘आदर्श डेअरी’ची संकल्पना निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धती आणि योजनांच्या माध्यमातून दूध व्यवसायात सक्रिय व्हावे, पशुसंगोपनातील पारंपरिक दॄष्टिकोन बदलून व्यवसायाभिमुख पशुपालन करावे; जेणेकरून महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक विवंचनेतून बाहेर पडू शकतात. देशातील एकूण रोजगारापैकी ९ टक्के रोजगारनिर्मिती दूध व्यवसायातून होते. रोजगारातील ही संधी अधिक वाढवून शेतकरी कुटुंबातील युवक, महिला व पर्यायाने मराठवाड्यातील ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी आदर्श समूह प्रयत्नशील आहे.

पशुपालन आणि दूध व्यवसाय देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. अत्यल्प दरात उच्च प्रतीचे पूरक अन्न पुरविण्यासह भूमिहीन शेतमजूर, अवर्षण क्षेत्रातील शेतकरी आणि ग्रामीण महिलांना दूध व्यवसायामुळे कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी मदत होते. ही बाब लक्षात घेऊन आदर्श समूहाचा डेअरी व्यवसाय सुरू करून त्याला अधिक विकसित करण्याकडे वाटचाल सुरू आहे.

दूध पॅकेजिंग करण्यासह दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी एकाच ठिकाणी सुविधा व यंत्रणा उपलब्ध आहे, तसेच दूध प्रमाण मापकासह, आधुनिक यंत्रणेद्वारे दुधावर प्रक्रिया केली जाते. आदर्श डेअरी फार्मच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना गुणवत्ता, सेवा आणि मूल्य वितरित करून विश्वसनीय दूध व दुग्धपदार्थ पुरविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत...!

आदर्श डेअरीचे उद्दिष्ट


अत्यंत उच्च दर्जाची खाद्य सुरक्षा आणि जैव-सुरक्षितता नियमांना अनुसरून नैसर्गिक, पौष्टिक आणि चवदार दुग्ध पदार्थ आणि पेये देऊन ग्राहकांचे निरोगी आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी आमची उत्पादने निरंतर अग्रेसर असतील.

आदर्श डेअरीची दूरदृष्टी


महाराष्ट्रातील दूध उत्पादन व्यवसाय - दुग्धजन्य पदार्थ आणि निरोगी पेयपदार्थांचा सर्वात विश्वासार्ह ब्रँड होण्यासाठी आणि आमच्या व्यवसायाच्या अधिकाधिक विस्तारासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहूत.

TOP