Adarsh Dairy Fresh & Healthy Milk Products

आमची इतर उत्पादने

Adarsh Milk

आदर्श दूध

प्राचीन काळापासून दुधाकडे आरोग्यासाठी एक जादूई औषधी म्हणून पाहिले जाते. दूध हा एक संपूर्ण आहार आहे, ज्यामध्ये कॅल्शियम, सोडियम, प्रथिने, जीवनसत्त्वे (ए, के आणि बी-12), चरबी, अमिनो अॅसिडस्, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक घटक असतात, जे शरीरात ऊर्जा संक्रमित करतात.

Adarsh Ghee

आदर्श तूप

अस्सल तूप हे दुधापासून तयार होत असल्यामुळे दुधामधील अ, ड, ई, क ही जीवनसत्त्वे स्निग्ध पदार्थात विरघळणारी असल्यामुळे ती आपोआपच तुपात येतात. तूप आरोग्य आणि त्वचेसाठीदेखील फायदेशीर ठरते. यासाठी प्राचीन काळापासून रोजच्या आहारात तुपाचा वापर करण्यास सांगितले जाते. तुपात मधुरता, शक्तिशाली, पित्तशामक, मेद आणि धातूंचे पोषण करणारे घटक असतात.

Adarsh Paneer

आदर्श पनीर

स्वास्थ्यवर्धक खाद्यपदार्थाच्या रूपात पनीर खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्यांना मांसयुक्त आहार पचविणे जड जाते असे रुग्ण, मुले, वृद्ध माणसे यांच्यासाठी पनीर हा श्रेष्ठ खाद्यपदार्थ आहे. यात प्रोटीन आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच कॅलरीजचेही प्रमाण मांसाहाराइतके असते.

TOP